मनातलं काही
कोसळणाऱ्या झऱ्याखाली दगडाचा आधार घेऊन उमलून आलेलं रंगीत रानफुल म्हणजे जगण्याची इच्छा - जुई 🌼 वाहणाऱ्या प्रवाहात जसं नितळ निळसर आकाशाचं प्रतिबिंब पडावं तसंच काही मन असावं तिचं. - जुई 💙 भवताली फुललेला लालसर गुलमोहर, दूरवर त्याचे झालेले आच्छादन तेव्हा इतके ही भडक वाटत नाही. पण हळूहळू त्याची लाली आपल्यात उतरत जाते. - जुई ❣️ उन्हाच्या झळा वाढत असताना अचानक पाऊस पडल्यावर आकाशातल्या सात रंगांची वाट पाहणारे डोळे आज खिडकीत दिसले ... तशीच वाट वाट पाहत होते माझी ... तिच्या आयुष्यात आलेला पाऊस होतो मी कदाचित... 🌿जुई🌼 कोसळणाऱ्या पावसाला शांत करणारी माती आपल्यात त्याला सामावून घेताना जशी भिजली होती, तशीच ती दिसली डोळ्यात पाऊस घेऊन त्याला पाहताना.. - 🍂जुई🍃. माझ्याकडे असलेले एक आवडते पान बोलवणारे मधुर शब्द हक्काचे ठिकाण वाढदिवसाच्या निमित्ताने सप्रेम भेट तुला स्वप्नांच्या वाटेवर यश भेटावे गौरेशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गौरेश ❣️