2025
नववर्षाच्या वाटेवरती स्वप्न साजिरे सजताना नव्या प्रवासा निघतो आपण मागे ठेवून पाऊल खुणा - जुई ✍🏻 ✨(2025)✨ एक खिडकीचा आडोसा घेतला स्वप्नाचा कानोसा टपोऱ्या डोळ्यात तिच्या दाटला मायेचा कवडसा - ©®जुई विजलेल्या या आकाशी अंधार देतसे ग्वाही त्याच्या ही वाटेवरती बघ फुलले आहे काही - जुई घर, कौलारू स्वप्नांचे हिरव्या सावलीत लपलेले ढग, डोंगर, सूर्य नी पक्षी चित्रा मध्ये दिसलेले - जुई नवी पाऊले टाकत आले असे एक नवे काही बाळाच्या येण्याने आईचे घर सारे आनंदून जाई - जुई एवढ्या दूर आले पण गाठीला बालपणीचा ठेवा तिथली एक गोड आठवण नेते परीकथेतील गावा - जुई अबोल आपल्या नात्यात बोलके डोळे पुरेसे तुझी सोबत असताना पायवाट ही सुंदर भासे - जुई🌿