भाव स्पंदने
चिरंतन असावी एक आस जीवनी
व्हावी तव चरणी, पावन ही धरणी
कर माझे जोडावे, अन भाव लोचनी
निराकार तू तर जगण्याची संजीवनी
***
ती मायेची सावली
करुणेची सरिता
उतराई जग सारे
अशी शक्तीची देवता
***
सुख गोंजारून यावे
निळ्या आभाळाची झोळी
कणाकणात भरलेली
जशी मायेची सावली
***
शब्दांचा तू जादूगार
कवितेतून मांडतो जीवनाचे सार
अव्यक्त भावनांना गुंफणारा
कवितेतला तू किमयागार
***
वाळू किनाऱ्यावरची असते ना
शिंपल्याना लाटांपासून सांभाळणारी
मौल्यवान मोती तेव्हाच होतात जेव्हा
मैत्री असते वेगवेगळ्या शिंपल्याना जोडणारी...
***
Comments
Post a Comment