2025
नववर्षाच्या वाटेवरती
स्वप्न साजिरे सजताना
नव्या प्रवासा निघतो आपण
मागे ठेवून पाऊल खुणा
- जुई ✍🏻
✨(2025)✨
एक खिडकीचा आडोसा
घेतला स्वप्नाचा कानोसा
टपोऱ्या डोळ्यात तिच्या
दाटला मायेचा कवडसा
- ©®जुई
विजलेल्या या आकाशी अंधार देतसे ग्वाही
त्याच्या ही वाटेवरती बघ फुलले आहे काही
- जुई
घर, कौलारू स्वप्नांचे हिरव्या सावलीत लपलेले
ढग, डोंगर, सूर्य नी पक्षी चित्रा मध्ये दिसलेले
- जुई
नवी पाऊले टाकत आले असे एक नवे काही
बाळाच्या येण्याने आईचे घर सारे आनंदून जाई
- जुई
बाळाच्या येण्याने आईचे घर सारे आनंदून जाई
- जुई
एवढ्या दूर आले पण गाठीला बालपणीचा ठेवा
तिथली एक गोड आठवण नेते परीकथेतील गावा
- जुई
अबोल आपल्या नात्यात बोलके डोळे पुरेसे
तुझी सोबत असताना पायवाट ही सुंदर भासे
- जुई🌿
तुझी सोबत असताना पायवाट ही सुंदर भासे
- जुई🌿
Comments
Post a Comment