2026

नव्या वहीची कोरी पाने पुन्हा नवी सुरुवात आहे
पानावर जे लिहिले जाईल कुतूहल त्याचे मनात आहे

- जुई ( १-१-२०२६)

काळाने पानावर लिहिली ती स्मरणीय भेट 
डोळ्यातून संवाद मनाचा झाला होता थेट

- जुई 

रंग फुलाचा पानाचा रंग प्रेमाच्या नात्याचा 
रंग निखळ मैत्रीचा रंग कवीच्या मनाचा 

- जुई 

आंब्यांच्या बनात हिरवी शाल
पेरूचं झाड अन जोडीला माड
केळीच्या पानात हिरव्या रानात
केळीचे फुलं पुरवते लाड

- जुई 
हाक आपुलकीची येते 
 अमूल्य असतो तो एक क्षण 
 कवितेसोबत लिहिणाऱ्या 
 हाताचे सुद्धा सुखावते मन 
- जुई 

Comments

Popular posts from this blog

भाव स्पंदने

मनातलं काही