शब्दालंकार

नजर तुझी जणु 
शांत किनारा 
नयन बोलके जणू
मुक्त वारा

...

साजीरा चेहरा 
कस्तुरीमृग भासे
वनात दडलेले
मग पुन्हा गवसे

...

थेंब हा पानावरचा
जणू मोतीयाची बरसात
पाझरे ठिपुस ठिपुस 
नभातून दिनरात

...


स्पर्श हा मातीचा
परी नवजीवनाची उर्मी
फुटलेल्या अंकुराला
अमृतच मिळे या जन्मी

...

सोबत आपली जणू 
दूध लोण्याचे साठे 
घुसळता रवीने 
तेव्हा वेगळे भेटे

...

क्षमा तू केलेली
जशी पानावरची शाई
पुसले न लिहिलेले
होईन कशी उतराई

नव्या प्रवासाची 
होती जुनीच वळणे
जवळून पाहिले होते
किरणांचे दूर पळणे

- जुई


Comments

Popular posts from this blog

भाव स्पंदने