झाडांची असते दाटी सडा सोन चाफ्याचा
हिरवी पहाट होते रोज झोपडीत माझ्या

- जुई

दूर एक ठिपका दिसलेला तेव्हा लाल
पाहत होता निळ्या सागरा नारंगी त्याचे गाल....

मावळत्या झाल्या त्याच्या तेव्हा गोल कडा
पसरली कमान  आणि झाला केशरी भवताल...

- जुई

विसावल्या किरणांना वेड प्रकाशाचे
निस्तेज पाण्यावर ही तरंग उठले त्यांचे 

- जुई

रंग वेगळे घेत मातीत दूर दूर तो बहरत आहे
पाऊस हिरवा अंतरीचा कड्याकपारी उतरत आहे.

- जुई

तिच्या आवडी, तिची काळजी, तिचे बोलणे आठवते
ती नसल्यावर हसणे, रुसणे, सोबत असणे आठवते

- जुई

तुझे माझ्यात असणे  माझे तुझ्यात असणे
कधी तुला शोधताना मला माझे  गवसणे

- जुई

इतके नाजूक इतके साधे असते काही
दूर तिथे त्या वेलीवरती फुलते काही 

- जुई

सुकले सुकले म्हणता म्हणता फुलू लागले
रंग फुलाचे सभोवताली  कळू लागले

- जुई

कुणी कुणाला कळले होते कुणी अचानक वळले होते

कुठे कुणाला पत्ता होता काट्यात फुल बहरले होते. 

- जुई

जिथे जिथे पाहत होते, तिथे तिथे दिसला होता
ज्या ठिकाणी मी होते, त्याच ठिकाणी तो होता

- जुई

या गर्द सावलीमध्ये वारा वाजवतो पावा

उनाड दिवसांमध्ये क्षणभर तोच विसावा

- ©®जुई🌿


Comments

Popular posts from this blog

भाव स्पंदने

शब्दालंकार