कवितेची फुले
मागुनी घेतली हासरी
सावली दाखवे गोजिरी
टाळते जायची वाट मी
का मला सांग रे साजिरी
***
रानफुले रानात
माझ्या मनात फुलली
सानुल्या कळ्या वेलीवर
सकाळ सजली
***
बळीराजा पाहतो वाट
धान्य सोन्याच्या मोलाचं
पिकवले मातीतून परी
रित राहिलं ताट त्याच
***
भुईवर फुलवाया
मारा काळजात केला
ठिगळं मातीची फोडून
हाती पाऊस ना आला
- जुईली अतितकर
Comments
Post a Comment