सदर ब्लॉग आठवणीतल्या साठवणीतल्या काही गोष्टी शब्दात व्यक्त केल्या आहे. अनुभव आणि आवड या दोन महत्त्वाच्या गोष्टीमुळे या ब्लॉगची निर्मिती झाली. वाचनाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या
- जुईली अतितकर
विजया दशमी
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
-
आपट्याची पाने देताना ठेवू निसर्गाचे भान
विजयादशमीच्या निमित्ताने चला फुलवू सुंदर रान
मनातला रावण जाळून ठेवू जबाबदारीची जाण
शिवरायांच्या विचारांनी राखू प्रत्येक स्त्रीचा सन्मान
चिरंतन असावी एक आस जीवनी व्हावी तव चरणी, पावन ही धरणी कर माझे जोडावे, अन भाव लोचनी निराकार तू तर जगण्याची संजीवनी *** ती मायेची सावली करुणेची सरिता उतराई जग सारे अशी शक्तीची देवता *** सुख गोंजारून यावे निळ्या आभाळाची झोळी कणाकणात भरलेली जशी मायेची सावली *** शब्दांचा तू जादूगार कवितेतून मांडतो जीवनाचे सार अव्यक्त भावनांना गुंफणारा कवितेतला तू किमयागार *** वाळू किनाऱ्यावरची असते ना शिंपल्याना लाटांपासून सांभाळणारी मौल्यवान मोती तेव्हाच होतात जेव्हा मैत्री असते वेगवेगळ्या शिंपल्याना जोडणारी... ***
झाडांची असते दाटी सडा सोन चाफ्याचा हिरवी पहाट होते रोज झोपडीत माझ्या - जुई दूर एक ठिपका दिसलेला तेव्हा लाल पाहत होता निळ्या सागरा नारंगी त्याचे गाल.... मावळत्या झाल्या त्याच्या तेव्हा गोल कडा पसरली कमान आणि झाला केशरी भवताल... - जुई विसावल्या किरणांना वेड प्रकाशाचे निस्तेज पाण्यावर ही तरंग उठले त्यांचे - जुई रंग वेगळे घेत मातीत दूर दूर तो बहरत आहे पाऊस हिरवा अंतरीचा कड्याकपारी उतरत आहे. - जुई तिच्या आवडी, तिची काळजी, तिचे बोलणे आठवते ती नसल्यावर हसणे, रुसणे, सोबत असणे आठवते - जुई तुझे माझ्यात असणे माझे तुझ्यात असणे कधी तुला शोधताना मला माझे गवसणे - जुई इतके नाजूक इतके साधे असते काही दूर तिथे त्या वेलीवरती फुलते काही - जुई सुकले सुकले म्हणता म्हणता फुलू लागले रंग फुलाचे सभोवताली कळू लागले - जुई कुणी कुणाला कळले होते कुणी अचानक वळले होते कुठे कुणाला पत्ता होता काट्यात फुल बहरले होते. - जुई जिथे जिथे पाहत होते, तिथे तिथे दिसला होता ज्या ठिकाणी मी होते, त्याच ठिकाणी तो होता - जुई या गर्द सावलीमध्ये वारा वाजवतो पावा उनाड दिवसांमध्ये क्षणभर तोच विसावा...
नजर तुझी जणु शांत किनारा नयन बोलके जणू मुक्त वारा ... साजीरा चेहरा कस्तुरीमृग भासे वनात दडलेले मग पुन्हा गवसे ... थेंब हा पानावरचा जणू मोतीयाची बरसात पाझरे ठिपुस ठिपुस नभातून दिनरात ... स्पर्श हा मातीचा परी नवजीवनाची उर्मी फुटलेल्या अंकुराला अमृतच मिळे या जन्मी ... सोबत आपली जणू दूध लोण्याचे साठे घुसळता रवीने तेव्हा वेगळे भेटे ... क्षमा तू केलेली जशी पानावरची शाई पुसले न लिहिलेले होईन कशी उतराई नव्या प्रवासाची होती जुनीच वळणे जवळून पाहिले होते किरणांचे दूर पळणे - जुई
Comments
Post a Comment