रूपक रचना

मायबाप माझे
वात्सल्याचा निवारा
पूजले तयासी अन 
सजवला मनाचा गाभारा 

...

तव वदनी
सरस्वती बोलते
विद्येचे दैवत 
शब्दात शोभते

...

खेळ असे ही
जगण्याची लढाई 
डाव एक अन 
जिंकण्याची ग्वाही

...

सहवास आपला 
दिनरातीचा खेळ
दमछाक होतसे 
घालता घालता मेळ

...

घर माझे आहे 
विश्वाचा पसारा 
कोपरा त्यातला 
एक सुप्त किनारा 

...

कष्ट हातचे उभ्या 
उंच पर्वताचे 
सुरकूतले आज 
रेषे भविष्याचे

...

मनीचे कोडे हे 
पेच ब्रह्मांडाचे 
आकाशी पसरल्या
गूढ अंधाराचे 

- जुईली अतितकर

Comments

Popular posts from this blog

भाव स्पंदने

शब्दालंकार