शब्द सख्या
श्रीरामाचे ध्येर्य
नसे शत्रूचे भय
रामायण घडवावे
त्यात एवढा आशय
...
हिमालय तो आहे उभा
डोळ्यासामोरी बलाढ्य
वादळे झेलून आपल्यावरी
करतो अस्तित्व साध्य
...
शब्द आपुले शस्त्र
हत्यार दुसरे नसे
गुंफले एकमेकांत
सौंदर्य तयाचे दिसे
...
तोच एक दिस होता
भगवान आले भूवरी
रामजन्म झाला होता
आयोध्या दिसली साजिरी
...
पीक माझं डोलणारं
सोन्याच्या राशी सम
सौख्य देई घरादारा
धन्य झाला हा जनम
...
रंग तुझ्या प्रेमाचा
नसे त्याला परिसीमा
न्हाऊन निघेल घर हे
प्रेमात तुझिया प्रियतमा
...
हाती तुझ्या आहे ग
अन्नपूर्णेचे वरदान
नसे तयाला तोड
ठेवितो कष्टाची जाण
...
लेक माझी गुणांची
तिला नसे कशाची भीती
यावे संकट बेहहतर
एकटी पुरवून उरती
- जुईली अतितकर
Comments
Post a Comment