शब्द बोलके

देह नव्हे ही
ज्वलंत मशाल 
जळत्या निखाऱ्यात
स्फुर्तीची ढाल

...

हास्य तुझे न
फुललेला चाफा
केसात मळूनी
उजळते रूपा

...

वेळ ही आजची
न पळणारा अश्व
लगाम धरता हाती
वाचतील जीव 

...

आरसा नव्हे  
ही भविष्याची वाट
चालता दोन पाऊले
झाली घनदाट

...

हात नाही ही
तर तलवार
रणांगण गाजवेल
इतकी त्याला धार 

...

हे मन नव्हे 
मयूराचे मोरपीस 
चमकते तेव्हा
पाही पावसाचे दिस 

- जुईली अतितकर

Comments

Popular posts from this blog

भाव स्पंदने

शब्दालंकार