शब्द मंथन

अधून मधून भेटीला विठ्ठला निघाले
वळण सरळ आले  पाय  साजे मिळाले
सहजच सरती वाटा तुझ्या चालताना सुबक रूप ग देवाचे तेव्हाही कळाले  

... 

लिहावी मलाही अशी मी कथा की
नदी वाहणारी प्रवाही जशी
नसावी तयाला सीमा वाहताना
असे ही जुळाव्या मनाच्या वेशी


...

तो असा मजला कळून ही
ना कधी कळला अजून ही
मागतो मज हे स्वप्नात की
का कसा तुजला जपेन मी

...

वेगळे असते मनात का
सांगता कळते तयास हे
तेच तेच नसे तरी पुन्हा 
माझं म्हणते हे उगाच रे

...

बहरात नव्या कशी 
फुलते खुलते सखी
सजते सजणी अशी
दिसते मजला जशी

...

आज परत त्या वाटेला 
जाता अलगद ये
पाश खडतरी वाटेचे 
येता निरखुन घे

- जुईली अतितकर

Comments

Popular posts from this blog

भाव स्पंदने

शब्दालंकार