श्रावण लेखणी

सर एक अशी ही यावी 
तुला मला भिजवून जावी
अंगणी तुझ्या माझ्या मनीची
ओंजळभर स्वप्ने पडावी

...

भिजले आज पावसात
क्षणाचा होता ओलावा
गारठ्यात हरवलेला 
कधीचा होता पारवा

...
संपली ती गोष्ट राहिल्या त्या आठवणी
पाहिलेली स्वप्न सरली एका क्षणी
भरलेले डोह जपलेले आहे मनी
वाट पाहते तिथेच उभी आहे अजुन ही

...

संवाद... विभिन्न विचारांच्या एकमेकांशी
अबोल भासणाऱ्या बोलक्या डोळ्यांशी
जवळ आलेल्या दोन मनांशी
संवाद माझी ओळख देणारा माझा माझ्याशी

- जुईली अतितकर






Comments

Popular posts from this blog

भाव स्पंदने

शब्दालंकार